Tuesday, 24 April 2012

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

या ब्लॉगच्या माध्यमातून पुरातत्त्व या विषयावर लेखन करण्याचा प्रयत्न करणार  आहे.
पुरातत्त्व शास्त्राची ओळख  आजच्या वाचकांना असेलही किंवा नसेलही. पुरातत्त्व शास्त्र म्हणजे काय? त्याचे महत्त्व काय? त्याची साधने कोणती? व या शास्त्राच्या मदतीने इतिहासाचा शोध योग्य दिशेने कसा घ्यावयाचा याचा परामर्श घेणार आहे. येत्या पाच वर्षांत मी अनेक ऐतिहासिक ठिकाणी स्वतः भेट देणार आहे. या भेटींतून मला गवसलेले सत्य तुमच्यासमोर मांडणार आहे. आज अक्षय्य तृतीयेच्या अक्षय शुभ मुहूर्तावर मला या संकल्पनेचे (ब्लॉगचे आणि संशोधनाचे) स्फुरण होणे ही माझ्यासाठी तरी एक अत्भुत घटना आहे.

तेव्हा स्टे ट्युनड् एवढेच म्हणतो आणि आपली रजा घेतो. वेळोवेळी मी पुरातत्व शास्त्राच्या बद्दल लेखन करणारच आहे. पण माझ्या प्रत्यक्ष अनुभवांच्या लेखनाला सुरुवात होण्यास कदाचित थोडा वेळ लागू शकतो. पण वाचकांची निराशा होण्याचे कारण नाही, कारण तोपर्यंत  आपण पुरातत्त्व शास्त्राची ओळख करुन घेणार आहोतच.

धन्यवाद,
सागर भंडारे
पुणे / बंगळुर

No comments:

Post a Comment